Home
About Us
Courses
Facilities
Girls Hostel
Boyes Hostel
Gym Khana
Photo Gallery
Online Grievance
Contact us
Approval
DTE Approval
SIF Report
PCI Approl
Feedback
निवासी अपंग कार्यशाळा बद्दल ची माहिती
श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडुरकी द्वारा संचलित निवासी अपंग कार्यशाळा झरी रोड चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर सदर निवासी अपंग कार्यशाळा शासनमान्य असून शाळेचे अनुन्यापिक क्रमांक झिरो 499 नोंदणी दिनांक 28 4 1999 ची वैधता 31 3 2026 पर्यंत आहे सदर कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ व कौशल्य विकास परीक्षा मंडळ मुंबई यांची मान्यता असून सदर कार्यशाळेत इलेक्ट्रिक वायरमन हा अभ्यासक्रम शिकवला जातो कार्यशाळेची मान्य विद्यार्थी संख्या 30 असून प्रवेशासाठी इयत्ता आठवी पास असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी 18 ते 45 वयापर्यंत चे अस्थिव्यंग विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता चाकूर हे तालुक्याचे ठिकाण असून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी एकमेव आमची कार्यशाळा मौजे चाकूर येथे.आहे सदर कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वायरमन चे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी विविध शिबिरे घेऊन तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन स्वर रोजगार करण्यासाठी मदत केली जाते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ती मदत केली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देताना त्यांच्यात असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेच्या वतीने दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पारितोषिक पटकावलेले आहेत. दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून विविध पारितोषके दरवर्षी नियमित पटकावले जातात एकंदरीत दिव्यांग विद्यार्थ्यांचा पुनर्वसन होणे स्वरोजगार सुरू करणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून आमची संस्था सन 1992 पासून अविरहित पणे चाकूर या ठिकाणी आज पर्यंत चालू आहे.