Home
About Us
Courses
Facilities
Girls Hostel
Boyes Hostel
Gym Khana
Photo Gallery
Online Grievance
Contact us
Approval
DTE Approval
SIF Report
PCI Approl
Feedback
संस्थेबद्दल ची माहिती :-
मुळात अपंग विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देणे लागते या अनुषंगाने श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडूरकी चे संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी नामदेव बाबाराव हाके तथा तत्कालीन सचिव कैलासवासी अशोकराव पाटील यांनी असा विचार केला की चाकूर प्रमाणेच अहमदपूर तालुक्यात सुद्धा अपंग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एखादी शाळा असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने सन 1991 ला ननिवासी अपंग विद्यालय चाकूर व सन 1992 ला निवासी अपंग कार्यशाळेचे चाकूर येथे स्थापना करण्यात आली.शाळेच्या माध्यमातून अपंग विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून आपले जीवन स्वावलंबी करतील या उद्देशाने सदरील कार्यशाळेची स्थापना संस्थेने केली आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून 1992 पासून आज पर्यंत अनेक विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहेत याचा सार्थ अभिमान संस्थेला आहे कारण जे आपण विद्यार्थ्यांना समाजामध्ये स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी कोणी थारा देत नव्हता तेव्हा संस्थेने कार्यशाळेची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिक्षण देण्याचे काम केल्यामुळे आज अपंग विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत असताना संसाराचा गोड गाडा ओढत आहेत. चाकूर तालुक्यातील दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संस्था अविरतपणे काम करत असताना शेजारी असलेल्या अहमदपूर तालुक्यातील पालकांची तीव्र इच्छा होती की संस्थेने अहमदपूर या ठिकाणी सुद्धा एखाद्या अपंग शाळा स्थापन करावी म्हणून पालकांच्या आग्रहास्तव अहमदपूर या ठिकाणी सन1992 मध्ये निवासी अपंग विद्यालयाची सुरुवात करण्यात आली या अपंग विद्यालयांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन सचिव यांनी केले यानंतर 1995 96 मध्ये सांगवी सुनेगाव सारख्या मन्याड नदीच्या काठावर तेथील विद्यार्थी जे अहमदपूरला येऊन आठवी ते दहावीचे शिक्षण घेत होते आणि या कारणास्तव बरेच मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होत होते ही गोष्ट फिरून तत्कालीन सचिव आणि तत्कालीन अध्यक्ष यांनी सांगितले गाव या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली आणि या शाळेतून सांगवी सुनेगाव रुई राळगा सांगवी तांडा राळगा तांडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली एवढ्यावरच न थांबता सांगवी या ठिकाणी अकरावी कला व विज्ञान तसेच बारावी कला व विज्ञान शाखा सुरू करून सांगवी व परिसरातील विद्यार्थ्यांना पाचवी ते बारावीचे शिक्षण अगदी मोफत देण्याचा प्रमाणिक प्रयत्न संस्थेने केला या ग्रामीण भागानंतर अहमदपूर सारख्या शैक्षणिक पंढरी म्हणून नावाजलेल्या शहरात संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिराची सुरुवात 1996 ला केली आणि ही शाळा अल्पावधीतच आयएसओ नामांकित झाली आणि या शाळेने लातूर जिल्ह्यात अल्पावधीतच आपले नाव प्रसिद्ध करून घेतले म्हणजेच या संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एमटीएस परीक्षा गणित ओलिंपियाड विज्ञान ओलिंपियाड ज्युनिअर सारख्या परीक्षांमध्ये राज्यामध्ये चमकू लागले मग यानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी भटक्यावरील मुक्त जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एखादे उपक्रम असणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर रुई तांडा सारख्या अगदी तांड्यावर स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रम शाळेची स्थापना 1999 ला केली आणि या शाळेमध्ये भटके व विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांना गावात उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण शाळा शिक्षणासाठी प्राप्त झाली या अनेक माध्यमातून संस्थेचे प्रामाणिक उद्देश लक्षात राहते.